पहिल्या पीवायसी स्नूकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत बदामीकर स्टार्स; जोग स्पेक्ट्रम कॉमेट्स संघांचे सहज विजय- Marathi News

12
पहिल्या पीवायसी स्नूकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत बदामीकर स्टार्स; जोग स्पेक्ट्रम कॉमेट्स संघांचे सहज विजय- Marathi News


पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पहिल्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत साखळी फेरीत बदामीकर स्टार्स, जोग स्पेक्ट्रम कॉमेट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध सहज विजय मिळवले.

Updated On:Aug 17, 2024 | 09:28 PM

Share on desktop

Share on mobile

पुणे : पीवायसी जिमखाना येथील स्नुकर अँड बिलियर्डसमध्ये हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत चौथ्या दिवशी सचिन संचेती, संजीव आगाशे, आनंद आपटे, रोहित सुगंधी, हर्षद शहा, सलील देशपांडे, दीपक सबनीस यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर जोग स्पेक्ट्रम कॉमेट्स संघाने सेनुमेरो रॉकेट्स संघाचा 6-1 असा एकतर्फी पराभव करून तिसरा विजय मिळवला.

दुसऱ्या लढतीत बदामीकर स्टार्स संघाने स्कायलाइन स्ट्रायकर्स संघाचा 5-2 असा सहज पराभव केला. बदामीकर स्टार्स संघाकडून सिद्धार्थ बदामीकर, राजवर्धन जोशी, सौमित्र रानडे, श्री शिरोडकर, दिव्यांश गोरे यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अन्य लढतीत सुप्रीम एसेस संघाने क्यु मास्टर्स संघाचा 4-3 असा पराभव करून सलग चौथ्या विजयासह अंतिम फेरी गाठली.

निकाल : साखळी फेरी :
बदामीकर स्टार्स वि.वि.स्कायलाइन स्ट्रायकर्स 5-2(15 रेड स्नूकर एकेरी: सिद्धार्थ बदामीकर वि.वि.समीर जोशी 96-85; 6 रेड स्नूकर दुहेरी: अंकित दामले/शक्ती चितळे पराभुत वि.आदित्य देशपांडे/हर्षा जैन 33-45; बिलियर्ड्स रेस टू 150: राजवर्धन जोशी वि.वि.साजनपवार प्रभाकर 151(46)-127; 6 रेड स्नूकर एकेरी: राजवर्धन जोशी वि.वि.अरुण बर्वे 43-07; 6 रेड स्नूकर दुहेरी: सौमित्र रानडे/श्री शिरोडकर वि.वि.संजय बामणे/अनुज मेहता 49-18; 6 रेड स्नुकर एकेरी: उदयन भागवत पराभुत वि.आदित्य देशपांडे 35-45; ब्लु बॉल शूटआउट: दिव्यांश गोरे वि.वि.इशांत रेगे 2-0);

सुप्रीम एसेस वि.वि.क्यु मास्टर्स 4-3( 15 रेड स्नूकर एकेरी: निमिश कुलकर्णी वि.वि.राजवीर राजाध्यक्ष 78-41; 6 रेड स्नूकर दुहेरी: संजीव पटेल/अमेय भावे वि.वि.अमीर आजगावकर/आदित्य जाधव 56-23; बिलियर्डस रेस टू 150: नकुल पटेल पराभुत वि.निशाद चौघुले 98-153; 6 रेड स्नूकर एकेरी: रोहित नारगोळकर पराभुत वि.कर्णा मेहता 36-46; 6 रेड स्नूकर दुहेरी: निमिश कुलकर्णी/स्वरूप कुलकर्णी वि.वि.अनिकेत शिंदे/मिहीर शहा 40-20; 6 रेड स्नूकर एकेरी: गिरीश दामले पराभुत वि.निशाद चौघुले 39-50; ब्लू बॉल शूट आउट: यश शहा वि.वि. यश काळे 1-0);

जोग स्पेक्ट्रम कॉमेट्स वि.वि.सेनुमेरो रॉकेट्स 6-1( 15 रेड स्नूकर एकेरी: सचिन संचेती वि.वि.योगेश लोहिया 55-25; 6 रेड स्नूकर दुहेरी: सचिन संचेती/संजीव आगाशे वि.वि.योगेश लोहिया/आरिन माळी 38-23; बिलियर्ड्स रेस टू 150: अशोक शेट्टी पराभुत वि.अमित भडभडे 91-152; 6 रेड स्नूकर एकेरी: आनंद आपटे वि.वि.विशाल मल्होत्रा 45-40; 6 रेड स्नूकर दुहेरी: रोहित सुगंधी/हर्षद शहा वि.वि.राजेश जैन/सत्यजित लिमये 64-44; 6 रेड स्नुकर एकेरी: सलील देशपांडे वि.वि.विशाल भुरट 60-30; ब्लू बॉल शूट आउट: दीपक सबनीस वि.वि.अद्वैत जोशी 1-0).

युवराज भगत

Administrator

युवराज भगतयांच्याविषयी

प्रिंट ते डिजिटल मीडियामध्ये 14 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत रिपोर्टींग ते उपसंपादक
डेस्कपर्यंत काम केले आहे. स्पोर्ट्सची सर्वाधिक आवड असल्याने, स्पोर्ट्स बीटवरील सर्वाधिक अनुभव. स्पोर्ट्स बीटवर प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम केल्याचा अनुभव. स्पोर्ट्स इडिटर/रिपोर्टर म्हणून कामाचा अनुभव. दै. सामना, दै. आज का आनंद, दै. पुढारी, ई-टीव्ही भारत अनुक्रमे रिपोर्टर, उपसंपादक, कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम केले. सध्या नवराष्ट्र डिजिटलमध्ये कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम करत आहे.

युवराज भगत

युवराज भगतयांच्याविषयी

प्रिंट ते डिजिटल मीडियामध्ये 14 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत रिपोर्टींग ते उपसंपादक
डेस्कपर्यंत काम केले आहे. स्पोर्ट्सची सर्वाधिक आवड असल्याने, स्पोर्ट्स बीटवरील सर्वाधिक अनुभव. स्पोर्ट्स बीटवर प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम केल्याचा अनुभव. स्पोर्ट्स इडिटर/रिपोर्टर म्हणून कामाचा अनुभव. दै. सामना, दै. आज का आनंद, दै. पुढारी, ई-टीव्ही भारत अनुक्रमे रिपोर्टर, उपसंपादक, कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम केले. सध्या नवराष्ट्र डिजिटलमध्ये कंटेट एडिटर/रायटर म्हणून काम करत आहे.



Source link : https://www.navarashtra.com/maharashtra/pune/badamikar-stars-in-1st-pyc-snooker-billiards-league-tournament-jog-spectrum-comets-teams-easy-wins-601623.html

Author :

Publish date : 2024-08-17 16:03:24

Copyright for syndicated content belongs to the linked Source.